La distance qui sépare le passé du présent se mesure peut-être à la lumière répandue sur le sol entre les ombres , glissant sur les visages, à la clarté crépusculaire. माझ्या सनातन स्वप्नबधिर पूर्णबिंदुत्वावर घाव घालणारं आनी एर्नो चं हे वाक्य. म्हाताऱ्या आज्जी ने स्वेटर विणत वेळ ओढून धरावा तशी वर्ष विणणारी तिची les annés नावाची काळयात्रा. जमिनीवर सांडणाऱ्या प्रकाशात, जो सावल्यांमध्ये वाहत जातो त्यात भूतकाळ आणि वर्तमानातलं अंतर मोजता येतं हा तिचा दावा. किव्हा चेहऱ्यावरून घसरणाऱ्या प्रकाशात. किव्हा ‘la clarté crépusculaire’ या शब्दांनी पूर्णबिंदुत्वाच्या तळाशीच सुरुंग लावला आणि एकच विस्फोट होऊन अनेक विरामचिन्हांच्या, अनेक भाषांच्या भाषांतराच्या, आणि मौनाच्या असंख्य ठिकर्या इंटरस्त्र विखुरल्या. ‘la clarté crépusculaire’ चा मराठी अनुवाद होतो ‘संध्याकालीन स्पष्टता’. हे पेस्टल गहिरे रंग, संधीप्रकाशात सूर भरणारे. किंव्हा आभाळातून दिसणारी अतिस्पष्ट रांग सूर्यकिरणांची. एखाद्या अजस्त्र हार्प सारखी. त्या हार्प वरून फिरणारी मानवाच्या स्वप्नवेल्हाळ निर्मीतीकैशल्याची अदृश्य बोटं. ते संगीत ऐकून कसे तुकारामी होतो आपण. दंग, तल्लीन, डोहात खोलवर बुडालेल्या दगडासारखे एकसंध. हे तिलिस्मि एकसूत्र. हा षड्ज अविरत, अनंत. वीसपुतेंनी गायलेल्या या भजनासारखं -
ओलायमान कॅनव्हासचा वास
पोचतो श्वासात रंध्रात
यकृता - फुफ्फुसात
ग्रंथींमध्ये ग्रंथांमध्ये
फटाफट उमटतात फटकारे
ब्रशातून पिसाट
ताणलेल्या कॅनव्हासच्या तबल्यावर
ब्रशची बोटं रेखतात
दुडकी दीपचंदी
रंगांच्या अंगातून ठिबकत
प्राचीन संगीत
कुठलंही मागणं नसताना
आर्त आळवणीत विकलत भजन
समाधीत होतो मी
नकळत निरवयव निरंजन
चित्र, कविता, संगीत, आणि स्वातंत्र्यात न्हाऊन निघालेले सगळेच उच्चार, हालचाली, क्षण कसे उफाळून येतात विद्रोहासारखे अचानक एकाएकी याच संधीप्रकाशात. संबंध अस्तित्वालाच येते भोवळ. हि जाणीव स्पष्टतेची cette clarté crépusculaire. संध्याकालीन स्पष्टता एवढी अवाढव्य होत जाते कि एक अंधत्वच येतं कल्पनेला. विश्वाच्या पसाऱ्यात हरवलेल्या एखाद्या उल्केसारखे एकाच रेषेत जात राहतो आपण. and this capitulation of senses and all particles surrounding the surroundingness of our surrounding or should I used the language of Kolatkar to call this state ‘Eventlessness of the fortune line on a dead man’s palm’ but who is the Mehmed al fatih of this fall of our constantinople ? या पराभवाचा धनी तरी नक्की कोण असावा ? हे वॊटरलू, करबला , कुरुक्षेत्र क्षणोक्षणी समोर येणारे पराभव. किव्हा पराभवाची माळ गळ्यात घालून मेलेला येझदीगर्द ? काम्यू च्या भाषेत सांगायचं तर , “les soires dans ce pays sont comme une trêve mélancolique.” या देशातल्या संध्याकाळी, एका उदासीन युद्धबंदी सारख्या. खरच का संध्याकाळी आपण असतो असे निशस्त्र ? आपल्या असलेपणाला आलेलं हे नागवपण. हे वेल्ड होत जाणं जाणिवांचं. दोन ध्रुवांचं. सगळ्याच प्रहारांचं , इतिहास आणि वर्तमानाचं हे सामावलेपण. -
दुरात माझी ढळे कृष्ण छाया, जसा कर्ण कुंतीत सामावला
तुझ्या तीक्ष्ण हातात माझी अहंता, तिथे अंत-प्रारंभ गे कोठला ?
ohh la majesté du temps, cet écoeurement vide. संधीकालाचे हे शिल्पामग्न क्षण. हवेत कोरून ठेवणारा ग्रेस. किशोरी च्या यमनातून उगवलेला, घासून घासून तीव्र झालेला तीव्र माध्यम कसा दाभण रुतत जावी शरीरात खोलवर तसा जात राहतो निरंतर. मेल्यावर कार्डियाक मॉनिटरवर येणाऱ्या सपाट, सरळ रेषेसारखा. The cause of our defeat. This mystic note and raga of Kishori and Grace as he writes - ‘संध्याकालीन धूळ मी उडविली, शब्दांध ग्लानीमुळे’ किती नेमकी सांगून जातोय तो अवस्था. संध्याकाळीच होतात मृत्यू. कृष्णाचा मृत्यू तसाच एका संध्याकाळी झाला असावा. कृष्ण उतरतो घोड्यावरून, पाणी प्यायला नदीत ओंजळ बुडवतो आणि एका पारध्याच्या नेम चुकतो त्याचा बाण पायात लागून कृष्ण मारतो. इतका फुटकळ आणि भडकनाट्यविरहित मृत्यू व्यासाने कृष्णाला का दिला असावा ? कारण एकाच, व्यासानी त्याच्या सगळ्याच पात्रांचा कंट्रोल सोडून दिला होता. अक्षय ने सांगितल्यासारखं -
समग्र जगातल्या समग्र शोधांची बीजं
ज्या ग्रंथात मांडल्याचा दावा केला होता
त्यातल्याच पात्रांनी गनिमी कावा केला होता.
संध्याकाळ, सगळ्याच प्रहारांचा अघोरी गनिमी कावा…!
No comments:
Post a Comment