दरवर्षी सज्जनगड गाठावा लागायचा. आमच्या घरी राम हे आराध्य दैवत म्हणून मानलं जातं. "मला रामरक्षा तोंडपाठ" आहे हे सांगणं म्हणजे युद्ध जिंकून आल्यासारखं काहीतरी मला वाटे. माझ्या घरचे त्याबद्धल माझं कौतुकही करीत. मला सज्जनगड फार आवडतो, हल्ली तिथल्या मंदिरांत मी जास्त जातच नाही. मी धाब्याचा मारुती नावाच्या एका पठारावर जाऊन बसतो. एकदा तर सकाळी ४ वाजताच तिथे जाऊन बसलो. देव मंदिरांमध्ये नाही हे तोपर्यंत मला चांगलच समजलेलं होत. देव असेल तर तो समोर पसरलेल्या सह्याद्री मध्ये असेल. ज्या सह्याद्री मधून तलवारीला तलवारी भिडल्या त्या तलवारीच्या आवाजातच देव असावा. सज्जनगडावर महाप्रसाद होतो त्यात जेवण सुरु करण्या आधी "आर्य सनातन हिंदू धर्म कि जय " असं म्हणावं लागे. त्यातला 'सनातन' हा शब्द मला जेवणातल्या भातात सापडलेल्या खड्या सारखा जाणवत राही. सनातन, timeless काळाच्या महाकाय लाटा ज्याला उध्वस्त करू शकत नाही तेच सनातन. आपला धर्म सनातन आहे काय ? ह्यावर विचार केला तर एकाच गोष्ट समजते. सनातन धर्म नाहीए सनातन आहे ती कविता. फक्त कविता. धर्म काळाच्या विशाल लाटांसोबत वाहून जाणाऱ्या होडीसारखा आहे. जी असंख्य बेटांवर थांबत जाते. कविता मात्र उभी राहते काळ्याशार सह्याद्री च्या रंगांसारखी.अभेद्य.
भगवद्गीता, वेद, उपनिषद ह्या सगळ्यांचं मूळ कविताच आहे. आपण त्यांना धर्म देऊन मोकळे झालो. भाषेच्या गळ्यात जानवं घालणे. भाषेच्या डोक्यावर टोपी ठेवणे असे बरेच उद्योग आपण करत असतो. असले उद्योग करणारे शेवटी येतात कविते पर्यंत. कविता मात्र त्यांना जुमानत नाही. धर्माचं आणि कवितेचं सदैव वाकड राहिलेलं आहे. कारण धर्माचं पाखंडी अस्तित्व आणि स्वातंत्र्यावर घाला घालणारी धर्माची नियमावली कविता कधीच मान्य करत नाही. धर्म देवाची पूजा करतो. कविता स्वातंत्र्याची पूजा करते. जे स्वतंत्र आहे तीच कविता आहे.
जर तुम्ही कवी आहात आणि ब्राह्मण सुद्धा आहात तर तुम्ही फक्त ब्राह्मण आहात कवी नाही. कवीची एक कवी सोडला तर काहीही ओळख नसते. कविता धर्माच्या अराजकतेविरुद्ध पुकारलेली क्रांती असते. कविता देश घडवते, भाषा समृद्ध करते. वेद काव्य आहे. भारतीय संस्कृतीचा पाया म्हणजे काव्य. रामायण महाभारत या कथा आहेत काय ? ती महा 'काव्ये' आहेत.
माणसाला उडता येत नाही म्हणून तो पक्षी पिंजऱ्यात ठेवत असतो. अगदी तसंच ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी नावाच्या कवीला आपण संतपणाच्या पिंजऱ्यात डांबून मोकळे झालो. त्यांनी भिंत चालवली, रेड्याच्या तोंडून वेद म्हणवले इत्यादी अश्या भाकड कथा आपण तयार केल्या. कवी ज्ञानेश्वराचा संत ज्ञानेश्वर करून आपण पिंजऱ्यातल्या पक्षाकडे कुतूहलाने पाहावं तसं त्याच्याकडे पाहू लागलो. महारष्ट्रानी पुढे अश्या अनेक कवींचे संत केले.
कवीला धर्म देणे भाषेला धर्म देणे हाच उद्योग आपण करत राहिलो. अमीर खुसरो हा त्यातलाच एक कवी जो कवी होता मुसलमान नक्कीच नाही. दिल्लीला त्याच्या मजार वर गेलो होतो. असंख्य धर्मांध मुस्लिम तिथे येऊन त्याला सलाम करत असतील, माथा टेकत असतील. पण त्या सगळ्या धर्माच्या नशेत धुंद असणाऱ्यांना खूसरवी कवितेने मात्र चपराक मारलेली आहे . त्या कवितेने इस्लाम च्या सगळ्याच संकल्पनांना झुगारून अनंताकडे झेप घेतली. खुसरो ची एक फारसी कविता म्हणते -
काफिर - ए - ईशकं मुसलमानी मीरा दरकार निस्त
हर रगे मुन तार गशता हाजत - ए - झुंनार निस्त
अर्थ- मी प्रेमाची पूजा करणारा काफिर (नास्तिक) आहे मला या मुस्लिम जमातीची गरज नाही माझी प्रत्येक नस एखाद्या तारे प्रमाणे ताणली आहे, ब्राह्मणाच्या धाग्याची मला गरज नाही.
कितीतरी मुस्लिम धर्मांध लोक रोज संध्याकाळी खुसरो ची गाणी ऐकत असतील, हिंदू मूर्तिपूजक आहेत म्हणून त्यांचा द्वेष करत असतील. अमीर खुसरो मात्र स्वतःला मूर्तिपूजक म्हणवतो. तो धर्म नाकारतो, स्वातंत्र्य स्वीकारतो ज्ञानेश्वरा प्रमाणे त्याची कविता ८०० वर्षांपासून टिकून आहे. सनातन आहे .
खल्क मी गोयद कि खुसरो बुदपरस्ती मी कुनद
आरे आरे मी कूनं बा खल्क मारा कार निस्त
अर्थ - या जगातले लोक म्हणतात खुसरो मूर्तिपूजा करतो. हो तो करतोच,हो तो करतोच त्याला या जगाची आणि लोकांची त्याला गरज नाही.
"हिंदू नाही ब्राह्मण नाही न मी एक पंथाचा " म्हणणारे केशवसुत आणि खुसरो आपल्याकडे बघून खोचक पणे हसत असावेत. स्वतः चा धर्म सोडून दुसऱ्याच्या धर्मच कौतुक करणं .जे आपल्या धर्माचे नाहीत त्यांनाही आपलं मानणं. हि कवितेची शिकवण असते. ती टोपीखालचा चेहरा बघते. जानव्यात गुंडाळून ठेवलेल्या छातीमधलं हृदय कवितेला दिसत असतं. आणि म्हणूनच रोज संध्याकाळी दारू आणि सिगरेट ऐवजी धर्म पिऊन ढगात जाणार्यांना कवितेचं फार वाकड असत. सुरेश भटांच्या या गझलेनी मात्र पळी पंचपात्र घेऊन कविता लिहिणार्यांना चांगल्याच गुदगुल्या केल्या होत्या.-
उजाड ओसाड वाळवंटी, खळाळणारा झरा मोहोम्मद
जगातल्या दिन दुःखितांचा अखेरचा आसरा मोहोम्मद
उर्दू कविते मध्ये " खुदा -ए- सुखन " म्हणजेच साहित्याचा देव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मीर तकी मीर ने हा शेर लिहिला तेव्हा त्याच्याविरुद्ध फतवे नक्कीच निघाले असतील.
मीर के दिनो मजहब का पूछे क्या हो उन्ने तो
कशका खींचा देहर मै बैठा कबका तर्क इस्लाम किया
अर्थ - मीर च्या धर्मा बद्धल काय विचारता ? त्याने तर टिळा लावलाय तो मंदिरात बसलाय आणि त्याने कधीच इस्लाम सोडून दिलाय.
आज आपल्या देशात मीर ची उर्दू भाषा मुस्लिम आहे. खरं तर भाषा कधीच हिंदू मुस्लिम नसते. तिला मुद्दाम धर्म दिला जातो. कारण काहींची दुकान धर्मावरच चालत असतात. हिंदू कवी, मुस्लिम कवी, भारतीय कवी, पाकिस्तानी कवी, इंग्रजी कवी, फ्रेंच कवी हे असं काही नसतंच. फक्त कवी असतो किव्हा कवयित्री असते. भारत - पाकिस्तानच्या सीमेपलीकडून मला हबीब जालीब, फैझ अहमद फैझ ऐकू येतात. ३००० किलोमीटर लांब असणाऱ्या फ्रांस मधून सुद्धा मला बोदलेयर आणि रेम्बो च्या कविता ऐकू येतात. आयुष्यभर एकाच खोलीत राहणाऱ्या माणसाला खिडकीतून दिसतं तेव्हढच आभाळ आहे असं वाटत असत. त्यांच्या खिडक्या म्हणजेच त्यांचं आभाळ. कविता मात्र मला त्या खिडकी बाहेर डोकावून पाहायला भाग पडते. कविता नेते सातासमुद्रा पलीकडच्या देशात. अज्ञात वाळवंटाच्या विस्तीर्ण प्रदेशात मला कवितेच्या पाऊलांचे ठसे दिसू लागतात. माणसाला माणूस म्हणून पाहायला कविता शिकवते. प्रत्येक कविता असते एक स्वातंत्र्य सार्वभौम देश. एक खरा निधर्मी लोकशाही देश. त्यात स्वातंत्र्य हाच कायदा. संस्कृती घडवली कवितेनेच धर्माने नाही.
कवितेने काय केलं हे नामदेव ढसाळ सांगतात -
कवितेनेच मला केले
निर्मळ निरागस निर्वैर
रात्रीच्या निळ्याभोर
आकाशातील ग्रहतारे मोजायला कवितेनेच
शिकवले मला
कवितेनेच मला खराखुरा
माणूस बनवून सोडले , नाहीतर या
नरकातून शक्य न्हवते मला बाहेर येणे -
अजूनही असतो नरकात तळमळत तडफडत
शी ! किती किळसवाणे हे .
पुढच्या वेळेस सज्जनगडावर जाईन तेव्हा मात्र क्षितिज कापत जाणाऱ्या सह्याद्री कडे पाहून म्हणेन -
" इस सनातन कविता कि जय !!!"