सखे
तू घातलेले असंख्य बुरखे
असंख्य कपड्यांनी झाकलेल तुझं
निर्दयी अस्तित्व
सापाच्या कातडी सारखं
आणि रात्रीच्या छाताडावर बसणाऱ्या
सूर्योदया सारखं
तू फेकून दे
आम्हाला दिसतायत तुझे सगळेच अवयव
बुरख्यापालिकडे सुद्धा
आणि सगळ्याच बंधनांचा पलीकडे
तू कितीही झाकलं स्वतःला तरी
तुझ्या नग्नतेचा बाजार मांडू आम्ही
सखे,
शतकानू शकतं तुला आम्ही ठेवलं
संस्कृतीच्या खोलीत
आणि बंद केलीत सगळीच दारं
आता मात्र तू अलीयेस बाहेर
असल्या नसलेल्या सगळ्याच भिंती तोडून
पण तरीही
आता सामावून घे सगळीच क्षितिज
आभाळभर पसरलाय संस्कृतीचा गडप अंधार
तू त्याच्यावर पहाटेच्या प्रहरासारखी
चवताळलेल्या योध्या सारखी
सशस्त्र चाल करून जा
हे आभाळ तुझं आहे
हे क्षितिज तुझं आहे
सहस्रक उलटून गेली
तरी तुला न मिळालेलं सगळं तुझं आहे
सखे,
तू मशिदीत बांग दे
तू उध्वस्त करून टाक
सगळ्याच मुल्लाचे सगळे शामियाने
एक दिवस
तुला बघेन मी
अस्थावयस्थ झालेल्या काब्यात
उध्वस्त आणि रक्तबंबाळ चेहेर्यानी
विजयाची नमाज पडताना
सखे,
व्हॅटिकन च्या चिमणीतून
तुझ्यासाठी सुदधा निघेल धूर
येशूला जन्म देणारी तूच होतीस
असं समजल्यावर
शेवटी सखे,
तुझ्या भोवती गळफास बनून फिरणारी
जानवी घेऊव
तू गाभ्यार्यात उभी राहा..!
तुझ्या योनीतील रक्तस्त्राव
मानवजातीच्या अस्तित्वावर केलेला अभिषेक असतो
असं ओरडून सांग त्या
शिवलिंगाला.
सखे
हजारो वर्ष लागलीयेत
असंख्य प्रेताच्या
असंख्य थरांवर चढली आहेस तू
कित्येक जण मेलेत
कित्येक लेखण्या संपल्यात
कित्येक क्रांत्या झाल्यात
कित्येल मिनार पडलेत
कोलमडून
एवढं सगळं सगळं केल्यावर तुला दिलाय
इतिहास्याच्या पेटार्यात ठेवलेला हा खंजीर
सखे
तू आता
संस्कृतीच्या पाठीत खंजीर खुपस...!
No comments:
Post a Comment